1.
|
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण ८ नियम ३० अन्वये मालमत्ता कर हा प्रत्येक
वर्षी १ एप्रिल व १ ऑक्टोबर याप्रमाणे दर सहामाही हप्त्यांनी आगाऊ देय होतो.
|
2.
|
बिलाची रक्कम स्वीकारताना प्रथम प्राधान्य प्रशासकीय आकार, वारंट / जप्तीफी व इतर वसुली
खर्च यांस दिले जाईल. त्यानंतर थकबाकी, प्रथम सहामाही व दुसरी सहामाही यांच्या बिलाची
रक्कम अनुक्रमे जमा करूनघेतली जाईल. मालमत्ता कर व पाणीपट्टी यामध्ये मालमत्ता कर प्रथम
खात्यावर जमा केलाजाईल.
|
3.
|
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार क्र. १४ – २७ एप्रिल २०१० व महाराष्ट्र महानगरपालिका
अधिनियम अनुसूची प्रकरण ८, कराधान नियम ४१(१) नुसार, मिळकतदाराने ज्या दिनांकापर्यंत
कराची रक्कम भरावयाची होती, त्या शेवटच्या दिनाकानंतर प्रत्येक महिन्यासाठी किंवा त्याच्या
भागासाठी अशा कराच्या २% इतकीरक्कम शास्ती म्हणून भरण्यास तो जबाबदार असेल आणि बिलाची
पूर्ण रक्कम देईपर्यंत अशी शास्ती भरण्यास तो जबाबदार असण्याचे चालू राहील. मिळकतकर
मुदतीत ( ९० दिवसाचे आत) न भरल्यास अधिनियम४१व ४२ अन्वये शास्ती व्याज आकारणी वाढत
राहील व इतर कायदेशीर कारवाईसमिळकतदार पात्र असेल.
|
4.
|
या बिलाच्या बाबतीत अपील करणे झाल्यास उक्त अधिनियम कलम ४०६ मधील तरतुदी प्रमाणे १००%
कर रक्कम जमा करणेची व त्या नंतरच मा. न्यायालयात अपील विचारार्थ स्वीकारण्याची तरतूद
आहे.
|
5.
|
सदर बिलाच्या मुदत काळात करामध्ये दरवाढ मंजूर झाल्यास, मालमत्तेच्या वार्षिक करपात्र
रक्कमेमध्ये वाढीव बांधकाम, नवीन आकारणी वगैरे मुळे वाढ, वापर, बदलझाल्यासतत्संबधीपुरवणी
अथवा फरकाची बिले काढली जातील व ती रक्कम भरणे बंधनकारक असेल याची नोंद घ्यावी.
|